world bicycle day 
health-fitness-wellness

आज जागतिक सायकल दिवस; सायकल चालवण्याचे हे 5 फायदे तुम्हाला माहिती हवेच

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 06 : आज जागतिक सायकल दिवस आहे. अनेकांना आपली पहिली सायकल आठवत असेल. सायकल शिकताना जेव्हा पहिल्यांदा तोल सांभाळू लागलात तेव्हाचा तो क्षण अनेकांना आठवत असेल. आपल्या अनेकशा आठवणी सायकलीसोबत जोडल्या गेल्या आहेत. आपली पहिली सायकल कशी होती हे अनेकांच्या स्मरणात असेल. सायकल हे वाहतुकीचं सर्वोत्तम साधन आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालवायला सोपी, परडवणारी असते. तसेच सायकल ही पर्यावरण अनुकूल आहे. 

गेल्या काही वर्षांपासून सायकलीचा वापर हा कमी झाला आहे.  पूर्वी कॉलेजमध्ये जाणारी मुलंही सर्रासपणे सायकल वापरायची, पण आता शाळेत जाणाऱ्या मुलांकडेही मोटार सायकल आल्या आहेत. सायकल वापरणे कमी प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे. असे असले तरी सायकल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. 

सायकल चालवणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरु शकतं. सायकल वापरणे परवडणारे तर आहेच पण तुमचे शरीर आणि मन चांगले ठेवण्यासाठी सायकल उपयुक्त ठरु शकते.

- सायकल चालवल्याने स्नायूंची चांगली कसरत होते. तुमचे पाय आणि मांडीचे स्नायू सायकल चालवल्याने मजबूत होतात. सांध्याची गतिशीलता सुधारण्यास आणि हाडे मजबूतीसाठी सायकल उपयुक्त आहे.

- सायकल चालवल्याने सामर्थ्य आणि तग धरुन राहण्याची क्षमता(stamina) वाढतो. रक्ताभिसरणही सायकल चालवल्यामुळे वाढते. 
 
- सायकल चालवल्याने ह्रद्य आणि रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती वाढत जाते. तसेच मानसिक ताणही सायकल चालवल्यामुळे कमी होतो. याबरोबरच चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत होते.

- नियमित सायकल चालवल्याने मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे एकूणच आपली कार्यक्षमता वाढते. तसेच आपला मूड चांगला राहण्यास सायकल चालवणे फायदेशीर ठरते. 

- अनेक खेळांसाठी विशेष प्रशिक्षण आणि नियमित सरावाची आवश्यकता असते. मात्र, सायकलींग हा व्यायामाच सर्वात सोपा आणि प्रभावी प्रकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता; पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाला सुवर्ण मयूर, ऋषभ शेट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

जन्मत:च राजासारखा थाट घेऊन येतात 'या' राशीचे लोक! सूर्यदेव देतात अफाट तेज अन् आत्मविश्वास

Zoho Share Dispute: घटस्फोटाचा वाद पोहोचला कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत; झोहोचे श्रीधर वेम्बू वादात; पत्नीचे गंभीर आरोप?

Raj Thackeray Dombivli : 'SIR प्रक्रियेवर लक्ष दिलं नाही तर जागा वाढवून काय फायदा?'; डोंबिवलीतून राज ठाकरेंचे मनसैनिकांना मोठे आदेश

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये लग्नसमारंभ सुरू असतानाच लष्कराचा बॉम्बहल्ला; पाच मुलांसह २१ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT